नांदेड सकाळवर शुभेच्छांचा वर्षाव
-
नांदेड : सनई चौघड्याच्या मंजुळ सुरावटींनी रम्य झालेल्या सायंकाळी असंख्य पावले कुसुम सभागृहकडे वाळत होती. विविध क्षेत्रांतील नागरिकांनी सकाळवर शुभेच्छांचा वर्षाव करून आपल्या प्रेमाची, विश्वासाची प्रचिती दिली. विचारांचे आदान-प्रदानही केले. निमित्त होते सोमवारी, दोन मार्च २०२० रोजी झालेल्या सकाळ नांदेड आवृत्तीच्या वर्धापन दिनाचे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा क्षेत्रातील घटकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनीही यात सहभाग नोंदवला.
(व्हिडिओ : सचिन डोंगळीकर नांदेड)
#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #NandedNews #Nanded #SakalNews #MarathiNews #Nanded #NandedSakalAniversary
esakal.com